top of page
website.jpg

खर्डा येथे जागतिक योगा दिन साजरा



खर्डा प्रतिनिधी/21जून2026


शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयात, दैनिक लोकमत,आर्ट ऑफ लिविंग परिवार खर्डा, खर्डा पोलीस स्टेशन, खर्डा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते रविशंकर जी यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक संतोष थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (श प) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक  वैजनाथ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण गदादे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.


  यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा व ज्युनिअर कॉलेज विद्यालयाच्या मैदानात शाळेतील विद्यार्थी खर्डा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, खर्डा ग्रामपंचायतचे सदस्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते शाळेचे शिक्षक यांच्यासह आरोग्य प्रेमींनी एकत्र येत जागतिक आरोग्य दिन साजरा केला यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात ,तुळशीदास गोपाळघरे व सेवा निवृत सैनिक बबन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना योग प्राणायाम सूक्ष्म योगा वर्मऊप नाडीशोध प्राणायाम सूर्यनमस्कार, ध्यान यासह विविध योग असणे घेऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी ही आरोग्य विषयक मार्गदर्शन केले


सर्व योग प्रशिक्षणात उपस्थित त्यांनी १०८ वेळेस ओमकार चॅटिंग केले यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना पावसाळा झालेल्या विलंबामुळे ओंकार चॅटिंग करण्यात आले तसेच या योग दिनानिमित्त शाळेमध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात योग प्राणायाम ध्यान सह संगीताच्या तालावर निसर्गाच्या मुक्त वातावरणात योगाची धडे गिरवली या विद्यालयात मैदानात झालेल्या सार्वजनिक अशा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली.

यावेळी खर्डा दैनिक लोकमत प्रतिनिधी संतोष थोरात, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, आर्ट ऑफ लिविंगचे साधक रवींद्र कुलकर्णी, वैशाली थोरात, धनसिंग साळुंखे, सेवानिवृत्त माजी सैनिक बबन नाईक, डॉ बिपीनचंद्र लाड, रवींद्र शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बडे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खाडे यांच्यासह होमगार्ड युनिट यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा रामनाथ ढाकणे प्रा शिवशंकर ठाकरे प्रा मुक्तेश्वर फामदे व पर्यवेक्षक तुकाराम विधाते यांच्या सह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक व साधक यांनी हा योग दिन यशस्वी साजरा होण्यासाठी परिश्रम घेतले.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page