top of page
website.jpg

खर्ड्यातून सुरु झाली मुशाफिरी यात्रा — ॲड. डॉ. अरुन आबा जाधव : भटके विमुक्त आदिवासी कुटुंब घरगणना व जनगणनेत वंचित राहणार नाही



खर्डा प्रतिनिधी/6जून2026


काल दिनांक 5/6/2026 रोजी खर्डा कान्होबा वस्ती येथे भटक्यांच्या पालावरून मुशाफिरी यात्रेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, भटके विमुक्त आदिवासी सतत भटकत आहेत, त्यांची घर गणना आणि जनगणना शासन  कशी करणार? त्यासाठी पूर्ण अ.नगर जिल्हा , पुणे जिल्हा, बारामती तालुका, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर जिल्हा , बीड जिल्हा  असे 14/06/2026  रोजी पर्यंत ही मुशाफिरी यात्रा चालणार आहे. या यात्रेमध्ये घर जनना तसेच जनगणना या विषयावर भटके विमुक्त आदिवासी यांच्या पालावर जाऊन या विषयावर जनजागृती करणार आहेत. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते, नगरसेवक, ॲड . अरुण जाधव यावेळेस बोलत होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण विकास केंद्राच्या सचिवा उमाताई जाधव, ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओहोळ ,पत्रकार दत्तराज पवार,सुनील साळुंके , आदिवासी नेते विशाल पवार तसेच सलीम मदारी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपस्थिती पत्रकार धनसिंग साळुंके ,मंगल शिंगाणे, उर्मिला कवडे, सचिन भिंगारदिवे, वैजिनाथ केसकर, जीवन परमार, पांडुरंग शिंगांणे, फकीर मदारी वैशाली पवार, आशाबाई काळे, ताई पवार, लता काळे, उषा पवार, शारदा पवार, मुस्तफा मदारी, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार निता इंगळे यांनी मानले.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page