top of page
website.jpg

ट्विस्ट इन जामखेड नर्स केस : प्रेम आमिष, नकार व इंजेक्शन.. .लग्न नकारून आत्महत्येस भाग पाडले... - प्रियकरावर गुन्हा दाखल!वाचा सविस्तर



जामखेड प्रतिनिधी | , १४ मे २०२६


जामखेडमधील खळबळजनक आत्महत्येनंतर न्यायाची पहिली चमक! लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वर्षे शोषण करणाऱ्या प्रियकरावर जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृत नर्स शबनम दस्तगीर सय्यद यांच्या आईच्या धैर्यवान तक्रारीमुळे हा प्रकरण न्यायाच्या दाराशी पोहोचला असून, दोन अल्पवयीन मुलांसह कुटुंबाला न्याय मिळेल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता जामखेड लोंढे हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये २९ वर्षीय नर्स शबनम दस्तगीर सय्यद (रा. जामखेड) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यात खळबळ माजवली होती. पोलीस वारंट न्यूज नेटवर्कने नागरिकांच्या वतीने अनेक  प्रश्न मांडले , ज्यामुळे तपासाला वेग आला.


मिळालेल्या माहितीनुसार, शबनम यांचे २०१३ चे लग्न पतीच्या मारहाणीमुळे २०२३ मध्ये घटस्फोटात संपले. दोन मुलांसह आई-वडिलांकडे राहत असताना शिक्षणादरम्यान त्यांची ओळख अली अब्दुल पठाण (रा. आष्टी, जि. बीड) याच्याशी झाली. लग्नाचे आश्वासन देऊन दोन वर्षे संबंध ठेवले, मात्र नंतर टाळाटाळ व "तुजे तुकडे करून फेकून देईन" अशा धमक्या दिल्या.


मानसिक त्रास सहन न करता शबनम २२ एप्रिल रात्री ड्युटीवर गेल्या. आई शायना दस्तगीर सय्यद यांनी तात्काळ जामखेड पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (भारतीय न्याय संहिता कलम १०८) गुन्हा दाखल केला. प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले, "तपास जोरदार सुरू आहे. पोस्टमॉर्टम, मोबाइल रेकॉर्ड्स व साक्षीदारांची चौकशी करत आहोत. न्याय मिळेलच!"


ही घटना महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागृतीचे प्रतीक ठरली. घटस्फोटित महिलांना होणाऱ्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. शबनम यांच्या कुटुंबाने धैर्य दाखवले, ज्यामुळे इतर पीडितांना प्रेरणा मिळेल.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 | 7558789697 | 8888785253

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page