उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांचे आवाहन — अज्ञात मृत महिलेची ओळख पटवा; रु.50,000 बक्षीस
- Police Warrant
- 7 hours ago
- 1 min read

बुलढाणा प्रतिनिधी — 3 जून 2026
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके वेगळे करून टाकलेल्या एका महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली होती. त्या तपासात सुरू असताना आता प्रकरणाला नवे व धक्कादायक वळण मिळाले आहे.
आधी ज्या महिलेची ओळख शिवानी कलमेकर म्हणून निश्चित करण्यात आली आणि तिच्या हत्येप्रकरणी तिचे वडील व भाऊ अटक करण्यात आले होते, तीच शिवानी जीवंत आढळल्याचे माहिती आल्याने आधीचा तपास प्रश्नचिन्हाखाली आला आहे.
या गुंतागुंतीच्या व संवेदनशील तपासाला आता मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. संतोष खाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी सार्वजनिक सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रकरणाच्या चौकशीत एका वेगळ्या ठिकाणी एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. सध्यापर्यंत त्या महिलेची ओळख निश्चित झालेली नाही. बुलढाणा पोलिस दलाने जनतेकडून माहिती मागविली असून तपासात उपयुक्त ठरणारी माहिती देणाऱ्याला रु.50,000/- रोख बक्षीस जाहीर केले आहे.
पोलिस आवाहन:
जर ही महिला आपल्या ओळखीची असेल, किंवा आपण तिला यापूर्वी कुठे पाहिली असेल, किंवा तिच्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती आपल्याकडे असेल, अथवा एखादी व्यक्ती अशी वर्णनाची गायब असेल, तर कृपया तात्काळ माहिती कळवा.
दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज, हालचालींची माहिती किंवा कोणतेही पुरावे असल्यास पोलीसांना द्यावेत.
संपर्क:
नियंत्रण कक्ष, बुलढाणा: 07262‑242400
श्री. संतोष खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर — 8459957187
पोलीस निरीक्षक सचिन बागूल, पो. स्टे. जळगाव जामोद — 9803219803
पोउपनि/गणेश कड, उपविभागीय पोलीस कार्यालय, मेहकर — 9552468970
बुलढाणा पोलीस दलाने नागरिकांना विनंती केली आहे की या संदर्भातील कोणतीही उपयुक्त माहिती त्वरित पोलीसांच्या ताब्यात द्यावी; तात्काळ माहिती मिळाल्यास तपास वेगाने पुढे जाईल व संभाव्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत होईल.




Comments