नेवासा पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त; ९ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त ; चालक फरार
- Police Warrant
- 1 hour ago
- 1 min read

नेवासा प्रतिनिधी/3जून 2026
नेवासा शहरात रात्री नाईट पेट्रोलिंग ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार भनाजी काळोखे, संदीप बर्डे आणि पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांना पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी फोनवर माहिती दिली की, नेवासा शहरामध्ये प्रवरा नदीपात्रात अवैधरित्या डंपरमध्ये वाळूची वाहतूक होत आहे. सदर माहितीनुसार पोलीस स्टाफ तेथे पोहोचला आणि खात्री केली असता एक लाल-पांढरी रंगाचा, विना-नंबर डंपर वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी डंपर थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने डंपर थांबवला. त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव काळू शिवाजी आडवे, राहणार गंगा नगर, असे सांगितले. वाळू वाहतुकीसाठी परवाना आहे का, असे विचारले असता तो अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेला.
पकडलेला डंपर नेवासा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला आणि त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सलमान मुक्तार शेख यांनी तक्रार दिली. डंपरसह ९ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईचे मार्गदर्शन माननीय पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांचे होते. कारवाईमध्ये पोलीस हवालदार भनाजी काळोखे, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस हवालदार संदीप बर्डे आणि पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांचा सहभाग होता.
नेवासा पोलीस स्टेशनकडून जारी करण्यात आलेल्या या प्रेस नोटनुसार, अवैध वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करून परिसरात कायद्याचे राज्य राखण्याचा पोलिसांचा संकल्प दिसतोय.




Comments