गांजा विक्रीचा डाव उघड;3.137 किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Police Warrant
- May 24
- 1 min read

अहिल्यानगर प्रतिनिधी :24 मे 2026
स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावात धडक कारवाई करत विक्रीसाठी आणलेला 3.137 किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 78 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि समीर अभंग, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे आणि चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
दिनांक 23/05/2026 रोजी बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, दादा सहादु दिघे, रा. येळपणे, ता. श्रीगोंदा हा आपल्या राहत्या घरी गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे.
त्यानंतर पथकाने तातडीने बेलवंडी पोलिसांशी समन्वय साधून कारवाई केली.
छाप्यात घरातून एक पिशवी मिळून आली. त्यात उग्र वास येत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे आणि बिया असलेला गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला. चौकशीत हा गांजा गौतम कुमार यादव, रा. बडगाव शिंदोडी, ता. जि. अहिल्यानगर, मूळ रा. देसपुर माझी, ता. सालिमपुरा, जि. पटना, बिहार याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले.
या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 188/2026 अंतर्गत NDPS कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची खरेदी-विक्री सुरू असल्यास तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर (0241-2416111) किंवा डायल 112 वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.




Comments