top of page

एक वर्षांपूर्वी आईचे झाले निधन आणि इकडे बापाने 13 वर्षीय चिमकुलीला केले प्रेग्नेंट...अन हॉटेल चालकानेही ... अंगावर काटा आणणारी घटना ...वाचा



जामखेड प्रतिनिधी/16एप्रिल2026


जामखेड तालुक्यात वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी भयावह घटना समोर आली.  तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नराधम बापाने आणि हॉटेल चालक जयदत्त कात्रजकर (उर्फ नाना, रा. कुसडगाव) याने बलात्कार केला असून, पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.


संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी येथे पीडित मुलगी आजी-आजोबा व वडिलांसोबत राहत होती. आईचे एक वर्षांपूर्वी निधन झाले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळी सुट्ट्यांमध्ये ऊसतोडणीसाठी सरदवाडी येथे आल्यानंतर हॉटेलवरील नळाजवळ पाणी घेताना हॉटेल चालकाने मुलीवर नजर ठेवली. घरच्यांना ऊसतोडणीसाठी बाहेर पाठवून त्याने मक्याच्या शेतात तिला नेहून तीन वेळा अत्याचार केले व जीवे मारण्याची धमकी दिली. नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान बीड जिल्ह्यातील सांगवी येथे ऊसतोडणीदरम्यान बापानेही अनेक वेळा मुलीवर अत्याचार केला.


एप्रिल २०२६ मध्ये वार्षिक परीक्षेसाठी संगमनेर आश्रमशाळेत परतलेली मुलगी शाळेच्या सूचनेने आजींसोबत मेडिकल तपासणीस गेली. संगमनेर ग्रामीण रुग्णालयात तीन महिन्यांची गर्भावस्था धक्कादायकपणे समोर आली.


संगमनेर पोलिसांनी मुलगी व बापाला जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. सपोनि वर्षा जाधव यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा दोन्ही आरोपींची नावे समोर आली. पीडितेच्या फिर्यादीवर पोक्सो व बलात्कार कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. १४ एप्रिल रात्री पी.आय. दशरथ चौधरी यांच्या पथकाने दोघांनाही बेड्या ठोकल्या. १५ एप्रिल रोजी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे करीत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page