top of page

"तुला काय करायचं ते कर": धमक्यांसह लाठी -गजाने जबर हल्ला;जामखेड शेतकऱ्याच्या वडिलांचा मृत्यू; २४ तासांत आरोपी खर्डा पोलिसांच्या ताब्यात



जामखेड प्रतिनिधी 16 एप्रिल2026


अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील  पिंपळगाव उंडा गावात (ता. जामखेड) १२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता घडलेल्या भयानक हल्ल्यात शेतकरी विष्णु मुरलीधर मोहळकर (५०, रा. पिंपळगाव उंडा, मो.  व त्यांच्या मुलाला आरोपी रविंद्र अर्जुन शिंदे (४६), कृष्णा रविंद्र शिंदे, समर्थ राजेंद्र शिंदे व सुवर्णा रविंद्र शिंदे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) यांनी लाठ, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण केली. विष्णूंचे वडील मुरलीधर दगडू मोहळकर (७०) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात, छातीत व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले.


उपचारादरम्यान १५ एप्रिल रोजी दुपारी ३:१५ वाजता मॅककेअर हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर खर्डा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (हत्या), १०९(१), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला

फिर्यादी विष्णू मोहळकर यांच्या घरासमोर आरोपींनी धावत येऊन "तू कोण आम्हाला आडवणारा? आम्ही कोठूनही येून शेतात बसेन, तुला काय करायचं ते कर" असे म्हणून शिवीगाळ व धमक्या दिल्या.

रविंद्र शिंदे: लाकडी काठीने विष्णू व त्यांच्या मुलाची पाठीवर मारहाण केली तर मुरलीधर यांना डोक्यात व पाठीवर वार केले .

कृष्णा शिंदे: लोखंडी गजाने विष्णूंचे कपाळ व पाठीवर, मुलाची मानेवर मारहाण केली  मुरलीधर यांना डोक्यात व छातीत हल्ला.

समर्थ शिंदे: विष्णूंच्या मुलाला लाथाबुक्यांनी मारले.

सुवर्णा शिंदे: शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी.

फिर्यादी १३ एप्रिल रोजी दुपारी ४:४२ वाजता गुन्हा दाखल केला. मृत्यूनंतर डेथ मेमो मिळाल्याने हत्येचे कलम वाढवले.

२४ तासांत  आरोपी अटक

खर्डा पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी .स.पो.नि.उज्वलसिंह राजपूत  यांनी दोन स्वतंत्र टीम्स नेमून आरोपींचा शोध घेतला. गुन्हा दाखल होताच रविंद्र शिंदे याला २४ तासांत अटक केली. उरलेल्या तीन आरोपींचा ताबडतोब शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यात सफौ रईस सय्यद, पोहेकॉ संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, पोकॉ. शशी म्हस्के, राहुल शिंदे, गणेश बडे यांनी केली आहे.

 
 
 

Comments


bottom of page