कर्जतमध्ये राजकीय भूकंप! रोहिणी घुले यांच्याविरुद्ध १३ नगरसेवकांचा अविश्वास प्रस्ताव राम शिंदे + रोहित पवार समर्थक एकजूट - नगराध्यक्ष पद धोक्यात!
- Police Warrant
- May 9
- 1 min read

कर्जत (अहिल्यानगर), ९ मे २०२६ :
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्याविरुद्ध मोठा राजकीय गदारोळ माजला आहे. एकूण १७ नगरसेवकांपैकी १३ जणांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना लेखी पत्र देऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून, त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.
१३ नगरसेवकांच्या सह्या: गटनेते प्रा. सतीश पाटील, सुवर्णा रवींद्र सुपेकर, उषा अक्षय राऊत, प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, लंकाबाई देविदास खरात, छाया सुनील शेलार, अश्विनी गजानन दळवी, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, नामदेव चंद्रकांत राऊत, अमृत श्रीधर काळदाते, ज्योती लालासाहेब शेळके.
नगराध्यक्ष कायद्याचे उल्लंघन करतात
मनमानी पद्धतीने नगरपंचायत चालवतात
आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण, सांडपाणी सुविधांवर दुर्लक्ष
नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय
राजकीय समीकरणे उलगडली!
सर्वात आश्चर्यकारक म्हणजे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे रोहित पवार यांच्या समर्थक नगरसेवक एकत्र आले आहेत. विरोधक एकत्र येऊन सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गटनेतेपदी प्रा. सतीश पाटील यांना मान्यता
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रा. सतीश उद्धवराव पाटील यांच्या निवडीला मान्यता दिली. विद्यमान गटनेते संतोष मेहत्रे यांचे अपील फेटाळून लावण्यात आले. मेहत्रे यांना बहुमत सिद्ध करता आले नाही (फक्त ४ नगरसेवक). सतीश पाटील यांनीच अविश्वास प्रस्ताव घडवण्यात पुढाकार घेतला.
आता काय?
अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का, याकडे कर्जत तालुक्यातील राजकारणकारणी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रा. राम शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. नगरपंचायतीत सत्ता परिवर्तन घडेल का, हे उद्या स्पष्ट होईल.




Comments