खासदार निलेश लंके यांची तब्येत बिघडली! अहिल्यानगरवरून पुण्याला तात्काळ हलवले, हेल्थ अपडेट समोर
- Police Warrant
- May 8
- 1 min read

आहिल्यानगगर प्रतिनिधी/8मे 2026
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहिल्यानगगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांची तब्येत गेल्या दोन-तीन दिवसांपासून खालावली होती. स्थानिक डॉक्टरांच्या उपचारांनंतरही सुधारणा नसल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना पुण्यातील प्रसिद्ध 'रुबी हॉल क्लिनिक'ला हलवण्याचा सल्ला दिला.
सध्या त्यांच्यावर खास डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लंके यांना गेल्या काही दिवसांपासून शारीरिक थकवा आणि अस्वस्थता जाणवत होती. अहिल्यानगरमध्येच प्राथमिक उपचार चालू होते, पण प्रकृतीतील गुंतागुंत वाढल्याने पुण्याकडे ट्रान्सफर करण्यात आला.
त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिन अद्याप जारी झालेले नाही.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच आहिल्यानगगर आणि मतदारसंघात समर्थकांमध्ये चिंतेची लाट उसळली. नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय असणारे लंके यांना आता काही काळ विश्रांती घ्यावी लागेल. अधिक अपडेटसाठी आम्ही नजर ठेवत आहोत.




Comments