गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे व तलवारसह आरोपी अटक
- DIGITAL FLY
- 19 hours ago
- 1 min read


सोनई प्रतिनिधी/6एप्रिल2026
दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विसापुर (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील अशोक लक्ष्मण कराळे (रा. विसापुर) हा सरस्वती विद्यालयामागील परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगून फिरतो आहे. सोनवलकर यांनी तात्काळ तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे व कारवाई करण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने विसापुर येथे जाऊन सरस्वती विद्यालयामागे संशयित इसमाला पकडले. पोलीस व पंचांची ओळख करून देत अंगझडती घेतली असता, आरोपीच्या पॅन्टीच्या खिशातून देशी बनावटीच्या गावठी कट्ट्याचे चार जिवंत काडतुसे मिळून आली. परवान्याबाबत विचारले असता, त्याने "परवाना नाही" असे कबूल केले.
आरोपीने कट्ट्याबाबत माहिती दिली नाही म्हणून घरझडती घेतली असता, दिवाणाखाली लोखंडी तलवार सापडली. पोलिस कस्टडीत तपासादरम्यान आरोपीने घरात लपवलेला गावठी कट्टा (पिस्तूल) उघड केला. हा कट्टा काळ्या रंगाच्या पट्ट्यांनी गुंडाळलेला व मॅगझीनसह होता.
रेकॉर्ड गुन्हेगार
अटकेतील अशोक कराळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अहिल्यानगरमध्ये त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत:
गु.र.नं. ८०/२०२०: भा.दं. कलम ३५४(ड), पोक्सो कलम १२
३३/२०१५: अन्नसुरक्षा व मानके २००६ कलम १८८,२७२,२७३
४८५/२०२०: महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५(ई)
१०३/२०१९: महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५(ई)
३९/२०१९: भा.दं. कलम १४३,३४१, मुंबई पोलिस अॅक्ट ३७(१)(३),१३५
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पीएस वैभव कल्लूबमे, उपविभागीय पीओ प्रविणकुमार लोखंडे (कर्जत विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पीआय नंदकुमार सोनवलकर व तपास पथकाने (पोउपनि मोहन गाजरे, भाडुसाहेब यमगर, रविंद्र औटी, भाऊसाहेब शिंदे, शरद गांगर्ड, विनोद पवार, दादासाहेब क्षिरसागर, रवि जाधव, भापकर) यशस्वी केली. तपास सुरू आहे.




Comments