जामखेड नगरपरिषदेत लाचेचा धक्का! रोहित पवारांचा 'शार्क माशा'वर हल्लाबोल! चिंगळ्या पकडल्या, मोठा मासा मोकाट
- Police Warrant
- May 7
- 1 min read

जामखेड, दि. 7 मे:2026
भाजपच्या ताब्यातील जामखेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावर आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईचा पंचनामा करत 'शार्क माशा'ला अडकवण्याची मागणी केली आहे.
जन्मदाखल्यासाठी ३ हजारांची लाच ACB ने दिनांक 6 मे रोजी सायंकाळी जामखेड नगरपरिषदेतील लिपीक आणि मदतनीसावर कारवाई केली. जन्मदाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल हे दोघे अटकेत घेण्यात आले. पण रोहित पवार यांनी म्हटलंय, "हे दोघे फक्त छोट्या चिंगळ्या आहेत. नगरपरिषदेतील खरा भ्रष्टाचाराचा 'शार्क मासा' अद्याप नामानिराळा आहे असे रोहित पवार म्हणाले
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितलं, "भ्रष्टाचाराच्या पाण्यात पोहणारा हा शार्क मासा सर्वांना माहीत आहे. प्रथम त्याला जाळ्यात अडकवून पाण्याबाहेर काढा. तेव्हाच चिंगळ्या नीट काम करतील आणि जामखेडकरांना भ्रष्टाचारातून सुटका होईल.
" विशेष म्हणजे, भाजपकडून या शार्क माशाला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप केला असून, तो हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रकरणाने जामखेडमध्ये राजकीय वातावरण तापलं असून, स्थानिक नागरिकांकडून भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी मागणी उमटत आहे. ACB च्या कारवाईनंतर पुढील तपास सुरू असून,आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.




Comments