डुप्लिकेट चावीच्या बहाण्याने चोरी; आरोपीला ओळखणाऱ्यांनी पोलिसांना कळवावे
- Police Warrant
- May 19
- 1 min read

अहिल्यानगर प्रतिनिधी/19 मे 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. डुप्लिकेट चावी बनवून देतो, असे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत घरातील किमती वस्तू आणि दागिने लांबविणाऱ्या आरोपीबाबत पोलिसांनी माहिती मागवली आहे. या आरोपीस कोणी ओळखत असल्यास तात्काळ पोलीस पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस ठाणे+91 8329008302 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती घरात प्रवेश मिळवून फसवणुकीच्या माध्यमातून चोरी करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.




Comments