top of page
website.jpg

माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात : अँड. विराज जायभाय व सोनु डुचे यांचा दुर्दैवी मृत्यू परिसरात शोककळा



जामखेड प्रतिनिधी/11,मे 2026


माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील आंबिलवाडी गावाजवळील वळणावर रविवारी (१० मे) रात्री भीषण अपघात घडला. जामखेडचे वकील अँड. विराज भगवान जायभाय (वय २५) व सोनु डुचे (वय २४) यांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील मित्र जखमी झाला आहे.


पुणे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणारे अँड. विराज जायभाय हे जेष्ठ वकील अँड. भगवान जायभाय यांचे पुत्र. मोठ्या भावाच्या लग्नकार्य उरकून सोनु डुचे व पुण्यातील मित्रासह तिघे (आय-२० एमएच १७ एझेड ३२४२) या चारचाकी गाडीतून रात्री जामखेडहून पुण्याला निघाले होते. आंबिलवाडी वळणावर अंदाज न आल्याने भरधाव गाडी रस्ता सोडून शेतात घुसली व पलट्या घालत उलटी झाली. शेतातील घरातील लोकांनी अपघाताचा आवाज ऐकून गाडीतून त्यांना बाहेर काढले व जामखेडला माहिती दिली.


या दुर्दैवी घटनेने जामखेड शहर व तालुक्यात शोककळा पसरली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार व विधीक्षेत्रातील सर्वांनाच धक्का बसला आहे.


जामखेड तालुका वकील संघाने मयत अँड. विराज जायभाय यांना श्रद्धांजली वाहिली असून, दुःखात सहभागी होत दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निवेदन वकील संघाचे अँड. अमीर खान यांनी दिले.


या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 | 7558789697 | 8888785253

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page