top of page
website.jpg

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे चौंडीत; अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी मुक्काम, रवींद्र सुरवसे यांनी केले स्वागत



चोंडी प्रतिनिधी/31मे 2026


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त राजस्थानचे महामाहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेब चौंडीत आले असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता.

काल दिनांक ३० मे २०२६ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुक्कामी आले.


त्यावेळी भाजपाचे धडाडीचे नेतृत्व आणि सभापती राम शिंदे यांचे निकटवर्तीय असणारे भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांनी हरिभाऊ बागडे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत भव्य स्वागत करत सन्मान केला.

रवींद्र सुरवसे हे भाजपा चे प्रमुख नेते आणि सभापती राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी राज्यपालांचे जन्मभूमीत स्वागत करून विशेष मान दिला.

यावेळी मा सभापती भगवान दादा मुरुमकर , बबन हुलगुंडे पांडुरंग उबाळे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते


ड्रोन शोने टिपलेले ऐतिहासिक छायाचित्र;

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वंशज सभापती प्रा. राम शिंदे यांचे आकाशात ड्रोन शोने टिपलेले छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे.

हा ऐतिहासिक क्षण सर्व अहिल्याभक्तांना अनुभवायला मिळाला आहे. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे , आमदार गोपीचंद पडळकर, व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.

ड्रोन शो अत्यंत भव्य आणि दिव्य झाला आणि हजारो लोक उपस्थित होते.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 | 7558789697 | 8888785253

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page