समाजकारणातून उजळला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद यांचा वाढदिवस — शिक्षण, आरोग्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिलं प्राधान्य“आधी केले मग सांगितले” — भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद
- Police warrant
- 3 hours ago
- 1 min read
जामखेड प्रतिनिधी/24ऑक्टोबर

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि साकत गटातील युवा नेतृत्व अजय काशीद यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेला. 22 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या आनंदाने साजरा झालेला त्यांचा वाढदिवस केवळ साजरा नसून समाजकारणाची दिशा देणारा उपक्रम ठरला.सामान्यतः वाढदिवस म्हटले की समारंभ, हारतुरे आणि पार्टी असते, मात्र अजय काशीद यांनी या सर्व औपचारिकतेला फाटा देत हा दिवस जनतेसाठी खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी साकत गटातील प्रत्येक गावात भेट देत शेतकरी, वंचित आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या.प्रत्येक गावात शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या गरजांना प्राधान्य देत त्यांनी काही गावांमध्ये शाळांसाठी प्रोजेक्टर, विद्यार्थ्यांसाठी बाकांची सोय, तसेच आरोग्यविषयक सुविधांची तातडीने पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.या भेटींच्या माध्यमातून त्यांनी तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा विश्वास संपादन केला. “शेतकरी, दीन-दुबळे आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांना न्याय मिळवून देणे हेच माझे पहिले ध्येय आहे,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.हा सामाजिक उपक्रम माननीय नामदार सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत अधिक अर्थपूर्ण ठरला. त्यांनी स्वतः अजय काशीद यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये तरुणाईत एक वेगळा उत्साह दिसून आला आणि “आपला माणूस – अजय दादा” असा स्वर सर्वत्र उमटला.
कोट
“आधी केले मग सांगितले” – काशीद कुटुंबाचा आदर्श
वारसा ; अजय काशीद यांनी आपल्या सारोळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत आदर्श शाळा बनवली. या उपक्रमासाठी शाळेला जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळून ₹5 लाखांचे बक्षीस प्राप्त झाले. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेद्वारे गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा गंभीर प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात आला.या कामगिरीमुळे सामाजिक बांधिलकी, शिक्षण आणि जलसंधारण क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांना सर्व स्तरावरून दाद मिळाली. समाजसेवेच्या या पायावर उभा राहून अजय काशीद यांनी आपल्या कुटुंबाचा सामाजिक वारसा जपण्याचे उत्तम उदाहरण घालून दिले.



Comments