"हा फक्त फराळ की राजकीय रणनीती?" – सभापती राम शिंदे आणि राजेंद्र फाळके यांच्या भेटीनंतर चर्चांचा महापूर!
- Police warrant
- Oct 25, 2025
- 1 min read

आहिल्यानगर प्रतिनिधी/२५ऑक्टोबर२०२५
अहिल्यानगर जिल्ह्याचे अनुभवी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरी अलीकडेच झालेल्या दिवाळी फराळ निमित्ताने भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.राजेंद्र फाळके हे 1984 पासून शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी मानले जातात. त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी कौटुंबिक कारणास्तव जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र या राजीनाम्यामागे आमदार रोहित पवार यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फाळके यांनी अद्याप या विषयावर माध्यमांसमोर भूमिका घेतलेली नाही.दरम्यान, राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या फराळ भेटीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रा. राम शिंदे आणि राजेंद्र फाळके यांच्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते. जरी ही भेट “सदिच्छा भेट” म्हणून सांगितली जात असली, तरी दोन्ही गटांतील या संवादाने जिल्ह्याच्या राजकारणाला वेग आलेला दिसतो.फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी झालेल्या या भेटीत फाळके कुटुंबियांनी सभापतींचा फेटा बांधून सन्मान केला. आता या भेटीनंतर प्रश्न उपस्थित केला जात आहे — राजेंद्र फाळके पुढे कोणती राजकीय दिशा निवडणार? या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Comments