ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांचा ईशारा : दोन आमदार, एक खासदार नागरिकांच्या विविध शासकीय योजनेकडे डोळसपणे बघावे ; अन्यथा आंदोलन!
- Police warrant
- 6 days ago
- 2 min read

आहिल्यानगगर प्रतिनिधी/30मार्च2026
दि. 30 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मुंबई व प्रादेशिक विभाग अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघ या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यासाठी शब्बीर भाई पठाण ॲड.डॉ अरुण आबा जाधव शशिकांत दादा पाटील सोमनाथ भैलुमे दत्ता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरिकांच्या 19 मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला
या मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील खेड्यापाड्यातून वयोवृद्ध महिला विधवा परितक्ता एकल लोककलावंत जेष्ठ व्यक्तींचा सहभाग होता प्रत्येक व्यक्तींची शासकीय लाभ मिळण्यासाठी धडपड होती मोर्चाची सुरुवात मराठी मुलांची शाळा ते कर्जत तहसील कार्यालयापर्यंत रॅली स्वरूपात काढण्यात आली जवळपास पाचशे ते सहाशे महिला पुरुष यांचा सहभाग होता.
यावेळी ॲड.डॉ.अरुण आबा जाधव म्हणाले की आमचा लढा संविधानिक मार्गाने आहे ज्या ज्या वेळेस लाभार्थी कर्जत तहसील ऑफिसला येतात त्यावेळेस तहसीलदार साहेब उपस्थित नसते तहसीलदार साहेबांचे दालन सतत बंद का असते संजय गांधी निराधार योजनेची मासिक मीटिंग दर दोन महिन्याला का होते असा सवाल विचारण्यात आला व जन्म दाखले मिळत नाही जेष्ठ विधवा महिलांना पंधराशे ऐवजी पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे घरकुल मिळावे रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड देण्यात यावे..
कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार व विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब खासदार निलेश लंके यांनी या घटनेकडे डोळसपणे बघावे नाहीतर दोन आमदार आणि एक खासदार यांच्या दारासमोर जेष्ठ नागरिकांना घेऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असे अरुण जाधव म्हणाले तसेच शब्बीर भाई पठाण म्हणाले की निवेदनात दिलेल्या एकोणीस मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तहसील कार्यालय कर्जत येथे जीवन यात्रा संपवेल यावेळी शशिकांत पाटील सोमनाथ भैलुमे तुकाराम पवार चांगदेव सरोदे भुजबळ महाराज संतोष चव्हाण यांनी भूमिका मांडल्या व कर्जत येथील कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले
यावेळी लखन पारसे तुकाराम पवार दत्ता भालेराव काजूरी पवार शितल काळे दिगंबर पवार मनीषा ताई सानप उपस्थित होते






Comments