35 दिवसांनंतर सिलिंडर? व्हायरल अफवांवर केंद्राचा खुलासा!
- Police Warrant
- Mar 25
- 1 min read

आहिल्यानगगर प्रतिनिधी/२५ मार्च२०२६
सोशल मीडियावर एलपीजी गॅस बुकिंगचे नवे कठोर नियम असल्याच्या बातम्या पसरल्याने ग्राहकांमध्ये भीती पसरली होती. पेट्रोलियम मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून हे दावे खोटे असल्याचे सांगितले असून, जुनेच नियम कायम आहेत
अफवेचा खरा चेहरा
काही पोस्ट्समध्ये दावा: PMUY लाभार्थ्यांना ४५ दिवस, इतरांना २५-३५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. यामुळे उज्ज्वला ग्राहक व शहरी रहिवाशांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली. इराण युद्ध व होर्मुझ सामुद्रधुनी बंदीमुळे गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जात होती.
सरकारचे स्पष्टपणे सांगितले नियम
मंत्रालयाने नियमांचे ब्रेकडाउन दिले:
शहरी भागातील रहिवासी: सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांचा कालावधी निश्चित आहे.
ग्रामीण भागातील रहिवासी: दुर्गम आणि ग्रामीण भागासाठी हा कालावधी ४५ दिवसांचा आहे. हे नियम सर्व ग्राहकांसाठी समान आहेत; यात उज्ज्वला योजना किंवा इतर कोणताही भेदभाव किंवा वेगळा प्रवर्ग करण्यात आलेला नाही. मागील डिलिव्हरी तारखेपासून वेळ मोजली जाते
पुरवठा व साठा सुरक्षित
देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध; जागतिक व्यत्यय असूनही टंचाई नाही. घाबरून (पॅनिक बुकिंग) लवकर बुकिंग केल्यास एजन्सी सिस्टीम आपोआप ब्लॉक करते. ही सिस्टीम शहरी-ग्रामीण सर्वत्र सारखीच



Comments