अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प: ना. पंकजाताई मुंडे
- Police warrant
- 6 days ago
- 2 min read

अहिल्यानगर दि.१० (प्रतिनिधी) :2026
अहिल्यानगर हे केवळ ऐतिहासिक शहर आहेच पण विकासाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श शहर बनविण्यासाठी महायुतीने केलेल्या संकल्पास पाठबळ देण्याचे आवाहन मंत्री पंकजा मुंढे यांंनी केले. पाणीपुवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, रोजगार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात कटीबध्द राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सौ. रोशनी आकाश त्र्यंबके, श्री. महेश रघुनाथ तवले, सौ. संध्या बाळासाहेब पवार व श्री. निखिल बाबासाहेब वारे या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मतदार सहभागी झाले होते.

जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रचार रॅली संत वामनभाऊ नगर चौक, तपोवन रोड–गाडेकर चौक, मुळे एस.टी.डी., लोकनेते गोपीनाथजी मुंडे मार्ग व संत भगवानबाबा चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. रॅलीदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधला.
प्रचार रॅलीत बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या,
महापालिकेत सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारे प्रतिनिधी असतील तरच शहराचा विकास वेगाने होतो. भाजपा–राष्ट्रवादी युतीचे उमेदवार विजयी करा. अहिल्यानगरला आधुनिक सुविधा, मजबूत पायाभूत व्यवस्था आणि नव्या रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. विकास हेच आमचे राजकारण आहे आणि तोच आमचा अजेंडा आहे.
पालकमंत्री या नात्याने शहर व जिल्ह्याच्या विकासाची स्पष्ट दिशा मांडताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,
अहिल्यानगरच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय, दर्जेदार रस्ते, सक्षम आरोग्य सुविधा, शिक्षण व रोजगार निर्मिती यावर ठोस काम सुरू आहे. महापालिकेत भाजपा–राष्ट्रवादी युतीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले, तर निर्णयक्षम प्रशासन मिळेल आणि विकासकामांना दुप्पट गती मिळेल. नागरिकांचे प्रश्न कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात सोडवले जातील.
या भव्य प्रचार रॅलीस माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार श्री. संग्राम भैय्या जगताप, भाजपा–राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार बंधू-भगिनींकडून मिळालेल्या प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले असून, भाजपा–राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या बाजूने सकारात्मक आणि भक्कम लाट निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे.











Comments