आहिल्यानगर महापालिका: भाजपा युतीची ऐतिहासिक हॅट्रीक, विखे पाटीलांचा जल्लोष!
- Police warrant
- 53 minutes ago
- 2 min read

आहिल्यानगर दि.१६ प्रतिनिधी
आहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून,विधानसभा, नगरपरीषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपा युतीने केलेली विजयाची हॅट्रीक असल्याची असल्याची प्रतिक्रीया मंत्री ना.विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
विधानसभा नगरपरीषद आणि महापालिका निवडणुकीत मिळालेला विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहील्यानगरच्या जनतेला समर्पित करीत असल्याचे त्यांनी याप्रसंगी आ.संग्राम जगताप डाॅ सुजय विखे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहराचे अध्यक्ष अनिल मोहीते विनायक देशमुख सुनिल रामदासी उपस्थित होते.
शहरातील आशीवार्द बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक युतीच्या कार्यकर्त्यासमवेत जल्लोष साजरा केला.भगव्या गुलालाची उधळण करून ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना मंत्री विखे पाटील यांनीही घोषणा देवून युतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
पत्रकार परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री विखे पाटील आ.संग्राम जगताप आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
आ.संग्राम जगताप आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढवण्यात आली.विकासाची एक भूमिका घेवून आम्ही जनतेसमोर गेलो होतो.जनतेने भाजपा राष्ट्रवादी युतीला मोठे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहील्यानगरच्या सभेतच विजयाची हॅट्रीक पूर्ण करण्याचा दिलेला शब्द आजच्या विजयाने पूर्ण केल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मोठे यश पाहाता राज्यातील जनतेन त्यांच्या नेतृत्वाला मोठे समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले.मुंबई पुणे महापालिका प्रमाणेच अन्य शहरामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासात्मक बदलाला लोकांनी स्विकारले हेच या निकालाने दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही हे निवडणुकीपुर्वीच मी सांगितले होते तेच निकालातून स्पष्ट झाले.झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत.लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.पराभव झाला की फक्त निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर टिका करण्यापलिकडे महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टिका ना.विखे पाटील यांनी केली.
अहील्यानगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले.नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा स्ट्राइक रेट तसाच राखला गेला.महानगर पालिकेच्या यशावर जनतेने केलेले शिक्कमोर्तब पाहाता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपाला मोठे यश मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.











Comments