आ.रोहित पवारांमुळे बावीत सभा मंडप; लोकार्पण सोहळा यशस्वी!
- Police warrant
- 4 days ago
- 1 min read

जामखेड, १२ जानेवारी २०२६:
जामखेड तालुक्यातील बावी येथे गणपती मंदिरासमोर बांधलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाले असून, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या हस्ते सोहळा पार पडला.
यावेळी विश्वनाथ राऊत, सूर्यकांत मोरे, संतोष निगुडे, आप्पा मोहोळकर, अरुण गाडेकर, ज्ञानदेव ढवळे, अमर चाऊस यांच्यासह बावी मधील माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन व संचालक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामस्थांनी या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले.











Comments