मुस्लिम-बागवान समूहाच्या महिलांकडून खर्डा येथे सौ. सुनंदाताई पवार यांचा विशेष सन्मान
- Police warrant
- 3 days ago
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी 13 जानेवारी 2026
जामखेड तालुक्यातील खर्डा शहरात आज दि-13 जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते पञकार रिजवान बागवान यांच्या निवासस्थानी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित (दादा) पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार यांचा मुस्लिम-बागवान समाजातील महिलांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मुस्लिम-बागवान समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येंने उपस्थित होत्या.आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई पवार या आज खर्डा दौऱ्यावर असताना सामाजिक कार्यकर्ते पञकार रिजवान बागवान यांनी आपल्या निवासस्थानी मुस्लिम-बागवान समाजातील महिलांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीमध्ये महिलांच्या विविध प्रश्नी चर्चा करण्यात आली.यावेळी सुनंदाताई पवार यांनी मुस्लिम-बागवान समाजातील महिलांना विशेष असे मार्गदर्शन केले.व मुस्लिम-बागवान समाजातील महिला भगिनिंचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर पाटील,खर्डा प्रेस क्लबचे पञकार दत्तराज पवार,मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे युवा नेते रिजवान बागवान,सामाजिक कार्यकर्ते रशिदभाई बागवान,हजरत बागवान,मोहीन (गुड्डु) बागवान,हरी गोलेकर पाटील,चाँद बागवान आदि.पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.











Comments