कै. हनुमंत मुरूमकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमृततुल्य कीर्तन!
- Police warrant
- Jan 8
- 1 min read

साकत प्रतिनिधी/8 जानेवारी2026
साकत गावचे माजी सरपंच कै. हनुमंत साहेबराव मुरूमकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी साकत येथे श्रद्धा व भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास ग्रामस्थ, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांचे अमृततुल्य कीर्तन झाले. कीर्तनातून सामाजिक कर्तव्यभावना, जीवनमूल्यांचा, एकोपा व सदाचार संदेश देण्यात आला. कीर्तनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
कै. हनुमंत पाटील मुरूमकर यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान ठरविले जात आहे उल्लेखनीय योगदान दिले आहे. सार्वजनिक सुविधांच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला. पुण्यस्मरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमासाठी कृ. ऊ. बाजार समिती माजी सभापती कैलास वराट सर, मा. सभापती संजय वराट सर, श्री. मंगेश आजबे, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, अजय दादा काशिद, सूर्यकांत दादा मोरे, बापूराव ढवळे, दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, विजय सिंह गोलेकर , नितीन ससाणे, माजी सरपंच कांतीलाल वराट तसेच कुटुंबीय श्री. सर्जेराव साहेबराव पाटील मुरूमकर, ऋषिकेश हनुमंत पाटील मुरूमकर व अभिषेक हनुमंत पाटील मुरूमकर तसेच बाबा महाराज मुरूमकर, रामभाऊ मुरूमकर, माजी सरपंच हरिभाऊ मुरूमकर, पोलीस पाटील महादेव वराट, सागर मुरूमकर, प्रमोद मुरूमकर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Comments