जामखेड: अरणगावात १३० लिटर डिझेल चोरी: स्कॉर्पिओ कारमधून चोरटे फरार!
- Police warrant
- 4 days ago
- 1 min read

जामखेड, १२ जानेवारी २०२६:
अरणगाव शिवार, ता. जामखेड येथील माथेरान हॉटेलसमोर पार्क केलेल्या ट्रकच्या डिझेल टाकीतून बुधवार दि.(९ जानेवारी २०२६) सकाळी ३ वाजून ४९ मिनिटांनी तीन अनोळखी चोरट्यांनी १३० लिटर डिझेल (अंदाजे किंमत ११,७०० रुपये, प्रतिलीटर ९०/-) चोरले. ड्रायव्हर प्रमोद सुग्रीव तट (वय ४०, रा. आपेगाव, ता. आंबाजोगाई, जि. बीड, यांनी शुक्रवार (११ जानेवारी) दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गु.र.क्र. १६/२०२६, बीएनएस २०२३ कलम ३०३(२) अंतर्गत तपास सुरू आहे.फिर्यादींच्या ट्रकचा (अशोक लेलंड २२१४ सुपर २००९ मॉडेल, आरटीओ MH १८ M ९६७०) डिझेल टाकीवर पांढऱ्या रंगाच्या विनानंबर स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चोरट्यांनी हात साफ केला. चोरट्यांनी लबाडीचा इरादा करून स्वतःच्या फायद्यासाठी डिझेल चोरून नेले आहे.
पोनि/चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका/इंगळे तपास करीत आहेत .
जामखेड परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतीमाल व इंधन चोरीमुळे ड्रायव्हर्स हैराण झाले असून पोलीसांनी स्कॉर्पिओ कारचा शोध व सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे.











Comments