जामखेड बेमुदत बंद! अतिक्रमण काढा, नाहीतर... सर्वपक्षीय जामखेडकर आक्रमक
- Police warrant
- 3 days ago
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी: 25 फेब्रुवारी2026
राष्ट्रीय महामार्ग ५४८डी (जामखेड-आहिल्यानगर) वरील शहरातील रस्त्याच्या कायमस्वरूपी कामाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाविरोधात सर्व पक्षीय बेमुदत बंद जाहीर. गेली साडेतीन वर्षे कासवगतीने चाललेल्या कामामुळे अपघात व जीवितहानी झाली असून, आता जामखेडकरांनी निर्णय घेतले आहे.
दि. २६/०२/२०२६ पासून अतिक्रमण काढण्याची अंतिम कार्यवाही होईपर्यंत बंद चालू राहणार. शासनाकडून कारवाई न झाल्यास बंद मागे घेतला जाणार नाही, अशी चेतावणी. सर्व व्यापारी, व्यवसायिक व ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले.
महामार्ग काम सुरू असताना अतिक्रमण मोठा अडथळा. कासवगतीमुळे अपघात वाढले; अनेक जखमी, काही जीव गमावले.विविध पक्ष, संघटना आंदोलने, मोर्चे, प्रशासकीय बैठका व जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी-सुचना करूनही अतिक्रमण काढले नाही.
जामखेडकर एकजूट
सर्वपक्षीय निर्णयाने बेमुदत बंद. प्रशासन जाग येईल ?हे पाहणे औत्सुक्याचे.या बंदमुळे शहरातील व्यवसाय ठप्प होतील. जामखेडकरांच्या या आंदोलनाने प्रशासन हलकेल का, हे उद्यापासून स्पष्ट होईल.











Comments