window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

रवी दादा सुरवसेंच्या पाठपुराव्याला सभापती राम शिंदे-मंत्री विखे पाटलांचा पाठिंबा! ‘पीएम सूर्य घर’ योजनेत खर्डा ‘मॉडेल सोलर व्हिलेज’



खर्डा (ता. जामखेड):24 फेब्रुवारी2026

ऐतिहासिक वैभव असलेल्या खर्डा गावाने आता आधुनिकतेची मोठी झेप टाकली आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’अंतर्गत खर्डा ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ (आदर्श सौर गाव) म्हणून निवडले गेले.

यामुळे गाव सौरऊर्जेवर चालणारे स्वयंपूर्ण आदर्श गाव बनेल.या योजनेत गावातील प्रत्येक घरावर सोलर पॅनेल बसवले जातील. नागरिकांना स्वच्छ, नवीकरणीय ऊर्जेचा लाभ मिळेल आणि वीज बिल शून्य होईल. गावात आनंदाची लहर उसळली आहे.


जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभापती रविदादा सुरवसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले.

खर्डा ग्रामपंचायतीसोबत गीतेवाडी, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, गवळवाडी, दरडवाडी व पांढरेवाडी या सहा वाड्यांचाही समावेश झाला आहे.जामखेड तालुक्यातून खर्डाची निवड ही अभिमानाची बाब आहे. भविष्यात हे गाव ऊर्जास्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक व तंत्रज्ञानप्रधान उदाहरण ठरेल.

योजनेचे प्रमुख फायदे

मोफत वीज: घराघरात सोलर पॅनेलमुळे वीज बिल वाचेल.विशेष निधी: रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्यासाठी सरकारी मदत.पर्यावरण संरक्षण: प्रदूषण कमी, गाव हिरवेगार राहील.सार्वजनिक सुविधा: पथदिवे, पाणी योजना व ग्रामपंचायतला सौर ऊर्जा.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.