जामखेडमध्ये बीड कॉर्नरला गुंडांचा कहर: हॉर्न वाजवल्याने मारहाण व तोडफोड, 6 जणांनवर गुन्हा दाखल
- Police warrant
- Jan 9
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/9 जानेवारी 2026
जामखेडमधील बीड कॉर्नरजवळ हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ वादाने हिंसाचार उफाळला. फिर्यादी व मित्राला मारहाण केल्यानंतर त्यांच्या दुचाक्यांची कोयत्याने तोडफोड करण्यात आली. जामखेड पोलिसात सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ६ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसाद दिनकर राजगुरू (२३, रा. सुतार गल्ली) त्याच्या मित्रांसह दुचाकीवरून बीड कॉर्नरकडे जात होता. यावेळी प्रसादने हॉर्न वाजवला, असा आरोप करत आरोपी सार्थक बळीराम राळेभात, पृथ्वीराज पवार, शिवम कोल्हे, महेश भगवान आजबे, साई प्रदीप जाधव व यश पवार यांनी गाडी आडवी केली. 'आमच्या पानटपरीसमोर हॉर्न का वाजवला,' अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
पृथ्वीराज पवारने पानशॉपमधून कोयता आणला. घाबरलेल्या प्रसाद व मित्राने दुचाक्या जागेवर सोडून पळ काढला. नंतर आरोपींनी प्रसादची मोटारसायकल (MH 16 DE 0826) व मित्र शाम अंकुश राजगुरू याची दुचाकी (MH 16 CW 8882) कोयत्याने तोडफोड केली.फिर्यादी प्रसाद राजगुरू यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून सर्वांना जामिनावर सोडले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. शिवाजी कदम तपास करीत आहेत.











Comments