नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणीसह विजयी नगरसेवकांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून सन्मान
- Police warrant
- 7 days ago
- 1 min read

जामखेड, दि.10 : जानेवारी2026
"तालुक्यातील पाणी कुठेही कमी होणार नाही, ही जबाबदारी माझी!" असा ठाम निर्धार जलसंपदा व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करताना त्यांनी जामखेडच्या विकासासाठी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सौ. प्रांजल चिंतामणी व सर्व नगरसेवकांचा सन्मान करून मंत्री विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजप अध्यक्ष नितीन दिनकर, मनोज कुलकर्णी, विनायक देशमुख, भाजपा नेते मधुकर राळेभात, नवनिर्वाचित नगरसेवक संतोष गव्हाळे, सागर टकले, प्रा. विकी घायतडक, मोहन पवार, पोपट राळेभात, हर्षद काळे, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. भगवान मुरूमकर तसेच पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
ऐतिहासिक विजय!
मंत्री विखे पाटील म्हणाले, "सौ. प्रांजली चिंतामणी यांचा विजय हा सर्वांचा विजय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीला जिल्ह्यात मोठे पाठबळ मिळाले. जामखेड नगरपालिकेतील हा विजय ऐतिहासिक आहे." आ. सुरेश धस यांच्या पाणी योजनेमुळे तालुक्यात पाणीटंचाई होणार नाही, तसेच जनतेला अन्याय होऊ देणार नाही, अशी हमी त्यांनी माध्यमांना दिली.











Comments