“‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ -भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून
- DIGITAL FLY
- Oct 16
- 1 min read
खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर

अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व माजी उपसभापती रविंद्र सुरवसे यांच्या मागणीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तातडीने प्रतिसाद देत जलसंपदा विभागाला तलाव दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.माजी उपसभापती रविंद्र सुरवसे हे अलीकडे आजारी होते. उपचारानंतर घरी परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांनी खर्डा येथे भेट दिली. संवादादरम्यान सुरवसे यांनी आपल्या तब्येतीपेक्षा मोहरी तलाव आणि परिसरातील पाण्याच्या प्रश्नाला अधिक प्राधान्य देत लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेण्याची आग्रही विनंती केली.क्षणाचाही विलंब न करता शिंदे यांनी थेट जलसंपदा विभागाचे अधिकारी घोरपडे यांच्याशी संपर्क साधून तलावाच्या दुरुस्तीची तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश दिले. शिंदे यांनी विभागाला “तलावात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होईल याचे नियोजन करा आणि कामात अडथळे येऊ देऊ नका,” असे आदेश दिले. त्यावर विभागाने ‘दोन दिवसांत काम सुरू होईल’ असा शब्द दिला आहे.या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आजारपणात असतानाही जनतेशी नातं जपत लोकहिताची मागणी करणाऱ्या रविंद्र सुरवसे यांच्या बांधिलकीचे कौतुक होत आहे.



Comments