विकासाची नवी उंची! दिघोळ–माळेवाडी रोडवरील मांजरा नदी पुलाचा प्रश्न अखेर मार्गी सभापती प्रा. राम शिंदे प्रयत्नांना यश
- Police warrant
- 7 days ago
- 1 min read

जामखेड, दि.10जानेवारी :2026
जामखेड तालुक्यातील दिघोळ-माळेवाडी रोडवरील मांजरा नदी पुलाच्या गेल्या अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर पूर्णविराम लाभला. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे ८ कोटींचा निधी मंजूर होऊन हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे
या पुलामुळे दिघोळ, माळेवाडीतील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. पावसाळ्यातील गैरसोय, धोकादायक वाहतूक आणि वेळेची नासाडी आता संपेल. अहिल्यानगर-बीड मार्गावरील दळणवळण अधिक सक्षम होईल.
भाजप कार्यकर्त्यांत आनंदाची लहर उसळली असून, नागरिकांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दूरदृष्टी, विकास तळमळी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे. दिघोळ-माळेवाडीतील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.











Comments