window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त;खर्डा जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप भारतीय जनता पार्टी जि.प.खर्डा गटाचा शैक्षणिक उपक्रम

  • Jan 2
  • 1 min read


खर्डा प्रतिनिधी/2,डिसेंबर2025

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आणि जामखेड तालुक्याचा अभिमान म्हणून ओळखले जाणारे मा.ना.प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी जि.प.खर्डा गटातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्रीच्या स्वरूपात भक्कम पाठबळ देण्याचा हेतू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


काल गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जि. प. प्रा. शाळा, खर्डा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलालशेठ खिवंसरा, सरपंच संजीवनीताई पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे, बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील,युवा नेते बाजीराव गोपाळघरे, केशव वनवे, नानासाहेब गोपाळघरे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे, राजू मोरे, भागवत सुरवसे, बाळासाहेब गोपाळघरे, कांतीलाल डोके, अण्णासाहेब शिंदे, रामदादा भोसले, नामदेव गोपाळघरे, राजू डोके, लक्ष्मण भोसले, दिलीप सुरवसे, भीमा सुरवसे, बबन सुरवसे, हरिदास गोपाळघरे, मच्छिंद्र येवले, दिगंबर सातारकर, टिल्लूशेठ पंजाबी, भैय्या चौगुले,अंकुश वारे,अनिल दराडे,सचिन सुरवसे,रोहिदास वनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर गोपाळघरे यांनी केले व मुख्याध्यापक आंधळकर सर यांनी आभार मानले.


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.