top of page

सोनईत मातंग समाजातील युवकाला मारहाण – ४ आरोपी अटकेत, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा समाजात तणाव टाळा – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले शांततेची आवाहन, आरोपींवर कठोर कारवाई होणार

सोनई प्रतिनिधी/२५ ऑक्टोबर२०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील युवकाला मारहाण प्रकरणसोनी येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मातंग समाजातील एका युवकाला काही जणांनी जबर मारहाण करून उचलून नेल्याची घटना घडली.

व्हिडिओ पाहण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सोनई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गी यांनी सांगितले.घटनानंतर समाजात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Comments


bottom of page