₹७५ हजारांची तार लंपास! काटेवाडी-राजुरी मार्गावर चोरट्याचा डाव
- Police warrant
- 5 days ago
- 1 min read

जामखेड, दि.11जानेवारी : 2026
मळेवाडी (पोस्ट विघोळ) येथील ठेकेदार निलेश महादेव रंधवे (वय ३१ वर्षे, रा. मळेवाडी पोस्ट-विघोळ / खंडोबावस्ती जामखेड, यांची अजिंक्य तारा हॉटेल (काटेवाडी शिवार) ते न्यू प्रविण हॉटेल (राजुरी) या मार्गावरील ३० विद्युत पोलांवरील जुवाकिअं अॅल्युमिनियम धातुची तार (एकूण किंमत ₹७५,०००) चोरीला गेली आहे
चोरी दि.३०/१२/२०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता ते दि.०५/०१/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता या कालावधीत घडली. फिर्यादींच्या तार कामाच्या ठिकाणी असलेली ही मौल्यवान अॅल्युमिनियम तार अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी लंपासली. दुपारी १३:४० वाजता फिर्याद दाखल करण्यात आली पोलीस नोंद करण्यात आली आहे.भान्यासंहिता २०२३ कलम ३०३(२) (चोरी) अंतर्गत गु.र.क्र. १४/२०२६ जामखेड पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. बांगर करीत आहेत.











Comments