BREAKING: अजित पवारांच्या मृत्यूपूर्वीच पोस्ट ७.३० मिनिटांत delete; रोहित पवारांचा खळबळजनक पुरावा!
- Police warrant
- Feb 18
- 1 min read

आहिल्यानगर प्रतिनिधी/18 फेब्रुवारी2026
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्या असून, गंभीर आरोपही केले आहेत. दरम्यान, भाजपा ट्रोलर्सकडून व्हीएसआरचा बचाव करण्यासाठी त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
समित ठक्करची संशयास्पद पोस्ट;
पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी समित ठक्कर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. ठक्करने विमान दुर्घटनेच्या दोन दिवस आधी 'महाराष्ट्रात काही मोठं घडणार आहे' अशी पोस्ट केली होती, जी साडे सात मिनिटांनी डिलीट केली. "महाराष्ट्रात अशी घटना घडणार आहे ज्यामुळे राजकारणात भूकंप येऊ शकतो," असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. रोहित पवार म्हणाले, "आमच्याकडे पुरावे आहेत. समित ठक्करला आम्ही सोडणार नाही, त्याची माहिती काढणार.
रोहित पवार म्हणाले, "मी एकदा विमानाने प्रवास केला होता. माझ्यासोबत सेलिब्रिटी क्रिकेटपटू होता. बारामतीत उतरून मतदारसंघात गेलो होतो. त्याने मला विचारलं, तुला कळलं नव्हतं का? म्हणजे आम्हा दोघांचाही अपघात व्हावा अशी अपेक्षा होती का? हे थर्ड क्लास ट्रोल भाजपाच्या प्रमुख नेत्यांचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसावी, पण लोक प्रश्न विचारत आहेत. भाजपाचे ट्रोल पैसे घेऊन रिट्वीट करतात.
"भावनेच्या भरात अराजकीय मुद्दे मांडताना ट्रोल का करतात? हे अहिल्यानगरचे भाजपा ट्रोलर्स आहेत. त्यांचे पेजेस काढतात आणि पैसे घेऊन काम करतात," असं रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, "प्रशासनाकडे दिलेली खासगी माहिती ट्रोलरला कशी मिळते? कागदपत्रं कशी पोहोचतात? प्रशासनात कोण आहे? लाज वाटली पाहिजे. फुकट माहिती दिली जात असेल तर अनेक प्रश्न उभे राहतात.
"मला वेड लागलं असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या दादा-काकांच्या अपघाताची चौकशी करण्याचं वेड लागलं आहे. तुम्हाला हवा तेवढा पैसा वापरा. माझे आजोबा मोठे, काका मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक अपघाताची चौकशी मागत आहेत, पैसे घेऊन काम करणारे चिरकूट नाहीत," असा इशारा त्यांनी दिला.











Comments