अजितदादा विमान घातपात? रोहित पवारांचा दिल्लीत खळबळजनक गौप्यस्फोट!
- Police warrant
- 7 days ago
- 1 min read

आहिल्यानगर प्रतिनिधी/21फेब्रुवारी2026
शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी २१ फेब्रुवारीला दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीवर सत्ताधारी नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप केला. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांना हस्तक्षेपाची मागणी केली.
दि.२८ जानेवारीला बारामती विमानतळावर व्हीएसआर कंपनीच्या लियरजेट विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. विमान उतरताना क्रॅश झाले आणि ब्लॅक बॉक्सबाबत संशय व्यक्त करण्यात आले.
रोहित पवार यांनी म्हटले, “घातपाताबाबत दोन प्रकारचे संशय: राजकीय आणि व्यावसायिक. व्हीएसआर कंपनीला शक्तिशाली लोक, सत्ताधारी नेते आणि डीजीसीए अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे.” ब्लॅक बॉक्समध्ये एकच नाही तर अनेक स्फोट झाले असावेत, तर अतिरिक्त पेट्रोल कॅनमुळे आग लागली, याची चौकशी हवी, असेही ते म्हणाले.
नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा द्यावा, कारण त्यांचा व्हीएसआरला पाठिंबा असल्याचा संशय, अशी मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे, त्यांना ईमेलने पत्र पाठवणार. विरोधी नेते राहुल गांधींनीही हात घालावा, अशी विनंती त्यांनी केली.तपासाबाबत चिंतातपास संथ आहे कारण कंपनीला मोठ्या लोकांचा आधार आहे. “अजितदादांना न्याय हवा असेल तर मोदी-शहाच न्याय देऊ शकतात,” असे रोहित पवार म्हणाले. यापूर्वी मुंबईत दोन आणि दिल्लीत ही तिसरी परिषद











Comments