अवैध दारू विक्रीवर गुन्हे शाखेचा छापा; ३५ हजारांची दारू जप्त!
- Police warrant
- Jan 28
- 1 min read

अहिल्यानगर, 28 जानेवारी 2026:
जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश देत स्थानिक गुन्हे शाखेला सूचना देणारे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिजळगांव ता. कर्जत येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या विकेत्यावर गुन्हे शाखेने धडक मारली. गुप्त माहितीच्या आधारावर छापा टाकून ३४,७९० रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे यांच्या पथकाला रवाना केले.
दि.२६ जानेवारी रोजी मिरजगांव पोलीस ठाणे हद्दीत गुप्त बातमीदाराकडून माहिजळगांव येथील सरकारमान्य दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये राहुल परसराम जागीरवार (वय ४०, रा. माहिजळगांव) अवैध दारू विकत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ छापा टाकून पंचांसमोर झाडी घेतली असता मोठ्या प्रमाणात दारू सापडली.या प्रकरणात भाऊसाहेब राजू काळे यांच्या फिर्यादीवरून मिरजगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरली असून, पुढील कारवाया सुरू आहेत.











Comments