आ. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक सागर गवसने यांचा पिंपळगाव उंडा विकासासाठी अवलिया ध्यास; तीन अपत्य असूनही निवडणूक न लढवता समर्पण! अजित दादा पवारांच्या स्मरणार्थ भव्य रोषणाई व शिवलीला!
- Police warrant
- Feb 17
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/17 फेब्रुवारी 2026
तीन अपत्य असूनही निवडणूक लढवता येत नसल्याचे माहित असूनही गावाच्या विकासासाठी धडपडणारा अवलिया आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक सागर (दादा) गवसने उर्फ मराठा यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

पाठिमागे आलेल्या पूरग्रस्तांना मदत करणे, लोकांसाठी देवदर्शनाची सोय, आदरणीय उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ महाशिवरात्री निमित्त शिवलीला अमृत ग्रंथ वाचन, श्री चन्नप्पा महाराज मंदिराला विद्युत रोषणाई, भैरवनाथ मंदिर येथे लाईट फिटिंग आणि महाप्रसाद यासह अनेक सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रम आयोजित करून त्यांनी गावकऱ्यांचे मन जिंकले आहे.
कै. सुभाष गवसने पुढारी विकास प्रतिष्ठान, मैत्री ग्रुप आणि आमदार रोहित दादा पवार मित्र मंडळ या संस्थांच्या मार्फत हे सारे कार्यक्रम राबवले जात आहेत. पिंपळगाव उंडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सागर गवसने यांनी स्वतःच्या वडिलांच्या कै. सुभाष गवसने पुढारी विकास प्रतिष्ठान मार्फत काम करण्याचा निर्धार केला आहे.
गावकऱ्यांच्या भल्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या सागर( दादा) गवसने यांच्या या कार्याची गावभर चर्चा होत आहे. या कार्यक्रमांमुळे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाले असून, स्थानिक विकासाच्या दिशेने मोठी पावले उचलली जात आहेत.











Comments