top of page
website.jpg

कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; सलग ८ चोरीचे गुन्हे उघड; ३.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त सराईत गुन्हेगार महादेव पवारसह साथीदार जखडले; गुन्हेगारी कारकीर्दीचा पर्दाफाश

आहिल्यानगर प्रतिनीधी/२६सप्टेंबर२०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाली असून तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 15 सप्टेंबर रोजी कर्जत येथील राशिन–काळेवाडी रोडलगत असलेल्या शिवम मशिनरी अँण्ड टुल्स दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून 64 हजार रुपयांचे कॉपर वायर चोरले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जिल्ह्यात व सोलापूर परिसरात वारंवार घडणाऱ्या कॉपर चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार करून आदेश दिले.


या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, महादेव भांड, अरुण मोरे व महिला अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने सलग आठ दिवस तपास करून कॉपर चोरीसाठी वापरली जाणारी चारचाकी गाडी शोधून काढली. तपासातून ही गाडी सोलापूर जिल्ह्यातील महादेव रंगनाथ पवार (रा. अकलुज) याच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्याला आणि साथीदार दादा लाला काळे (रा. सावंतगाव) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी टोळीतील अन्य साथीदारांची माहिती दिली.


पोलिसांनी यांच्याकडून 3.59 लाख रुपयांचा कॉपर वायर व मुद्देमाल जप्त केला असून आरोपींनी एकूण 8 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.


उघडकीस आलेले गुन्हे


कर्जत, जि. अहिल्यानगर – 2 गुन्हे


अकलुज, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, वैराग (जि. सोलापूर) – 6 गुन्हे


आरोपींचे जुने गुन्हे


ताब्यातील मुख्य आरोपी महादेव रंगनाथ पवार हा रेकॉर्डवरील सराईत असून सोलापूर, सातारा, धाराशिव, रायगड व पुणे जिल्ह्यात दरोडा, घरफोडी आणि चोरीचे एकूण 13 गुन्हे आधीच नोंदलेले आहेत.


सध्या आरोपींना कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.