कर्जत शहरात अवैध गुटखा विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचा भांडेवाडीत छापा;२ जण ताब्यात; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Police warrant
- Oct 25
- 2 min read

अहिल्यानगर (दि. 30 सप्टेंबर) –
जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या असून त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून कर्जत शहरात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत भांडेवाडी येथे छापा टाकून 3 आरोपींविरुद्ध गुटखा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल 3 लाख 566 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.छाप्यातील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक 29 सप्टेंबर रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहिती मिळाल्यानंतर भांडेवाडीत दाखल झाले. येथे स्थानिक युवक सचिन सोपान झगडे (वय 42) आपल्या राहत्या घरी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती गांभीर्याने घेऊन पथकाने तत्काळ छापा मारला.घराची झडती घेतल्यानंतर सचिन झगडे व त्याच्यासोबत स्वप्निल सोनवणे (वय 23, रा. लोणी मसदपूर, ता. कर्जत) असे दोघे इसम आढळले. झडतीदरम्यान आर.एम.डी., हिरा, विमल, डायरेक्टर स्पेशल अशा पानमसाला गुटख्यासह सुगंधी तंबाखू मिळून एकूण 2,68,566 रुपयांचा गुटखा जप्त झाला. याशिवाय 32,000 रुपयांची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल अशा प्रकारे एकूण 3,00,566 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींची माहिती व तपाससचिन झगडे व स्वप्निल सोनवणे यांना पथकाने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी हा गुटखा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवन येथील भाऊसाहेब किसन सकुंडे याच्याकडून आणल्याचे सांगितले. सकुंडे हा सध्या फरार असून त्याच्या मागावर पथक कार्यरत आहे. या तिघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कायदेशीर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेतील भाऊसाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. 536/2025 नोंद झाली असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 व 2011 मधील कलम 26 (2), 27 (3), 59 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.विशेष पोलिसी पथकाची कामगिरीही कारवाई पोउपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, हृदय घोडके, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखाली ती यशस्वीरीत्या पार पडली.











Comments