खर्डा उपकेंद्रातील 5 MVA ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नागरिक त्रस्त; रोहित पवारांची महावितरणकडे तातडीने नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी
- Police warrant
- 3 days ago
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/17 डिसेंबर2025
कर्जत-जामखेड मतदारसंघातील खर्डा (ता. जामखेड) उपकेंद्रातील 5 MVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासह मूलभूत सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याची मागणी करत नागरिकांच्या हिताचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
खर्डा उपकेंद्रातील 5 MVA ट्रान्सफॉर्मर जळाल्याने खर्ड्यासह परिसरातील गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून शेतीपिकांना पाणी देणेही कठीण झाले आहे. परिसरात अंधार आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले.शेतकऱ्यांची दुहेरी कोंडीसध्या खरीप हंगामात शेतीपिकांना नियमित पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके कोमेजण्याचा धोका निर्माण झाला आहे. पंपांना वीज न मिळाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था करणे अशक्य होत असून आधीच नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खर्डा उपकेंद्रात तातडीने दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत चर्चा केली आहे. पवार यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन नवीन ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवण्याचे आश्वासन दिले असून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन ट्रान्सफॉर्मरची मंजुरी व बसवणीची प्रक्रिया सुरू असली तरी त्यात कोणताही अतिरिक्त विलंब होता कामा नये तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी असे रोहित पवार यांनी आवाहन केले आहे.











Comments