window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

खर्डा ग्रामस्थ भडकले! अतिक्रमण व विकास मुद्द्यांवरून तूफान चर्चा



खर्डा प्रतिनिधी/२४ डिसेंबर२०२५

खर्डा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. येथे विकासकामे, थकबाकी सवलत योजना व ग्रामदैवत कानिफनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. काही काळ वातावरण तापले, तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली.

ग्रामसभेत१ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकी व तालुका थकबाकी ३१ मे २०२५ पर्यंत भरल्यास ५० टक्के करसवलत मिळेल, अशी माहिती देण्यात आली.

कानिफनाथ मंदिर यात्रा उत्सवासाठी अतिक्रमण हटवून मोकळी जागा उपलब्ध करावी.घरकुल योजनेंतर्गत नवीन मागण्या व चालू लाभार्थ्यांना निधी.सार्वजनिक ठिकाणी मुतारी व शौचालय बांधकाम.खैरी मध्यम प्रकल्प ते खर्डा पाणीपुरवठा योजना पूर्ववत करणे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पंधराव्या वित्त आयोग निधी.उर्दू शाळेसाठी वर्गखोली व शौचालय बांधकाम.विद्युत खांबांवर बल्ब लावून वीजपुरवठा सुरळीत करावा.सरपंचांनी विरोधकांकडून कामात अडथळे आणला जात असल्याचा आरोप केल्याने वातावरण तापले. यावर ग्रामस्थ व सदस्यांनी विकासासाठी राजकारण न आणण्याचे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब तिडके यांनी शासकीय नियमांनुसार अतिक्रमण हटवले जाईल, असे स्पष्ट केले. ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.