खर्डा पोलीस स्टेशन येथे प्रजासत्ताक दिन साजरा
- Police warrant
- Jan 26
- 1 min read

खर्डा, २६ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी):
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता तिरंगा फडकावण्यात आला .
यावेळी राष्ट्रगीत व शिस्तबद्ध सलामीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक व पत्रकार उपस्थित होते.पोलीस कर्मचाऱ्यांची शिस्तबद्ध परेड झाली. संविधानाच्या आदर्शांचे पालन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.यावेळी देशभक्तीपूर्ण संदेश देऊन समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाच्या मूल्यांचा प्रचार करण्यात आला. संपूर्ण पोलीस स्टाफ व नागरिकांनी सहभाग घेतला .











Comments