खर्डा येथे माता रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी; बालनृत्य, पूजनाने उत्साहापूर्ण शोभा
- Police warrant
- Feb 8
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/8फेब्रुवारी2026
धम्म सागर बुद्ध विहार, भीमनगर येथे माता रमाई डॉ. भीमराव आंबेडकर यांची दुसरी जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. शेकडो बालक-बालिका, उपासक-उपासिकांची उपस्थिती आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.तरुण भीमसैनिकांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित महिलांनी पुष्पहार अर्पण केले, तर फटाक्यांची आतिषबाजीने वातावरण उन्मादपूर्ण झाले. शेकडो बालक-बालिकांनी वंदना घेऊन अभिवादन केले.भिमराव घोडेराव यांनी माता रमाईंच्या ऐतिहासिक जीवनकार्यावर प्रकाश टाकला. लहान बालक-बालिकांनी रमाई व बाबासाहेबांवरील गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक जावळे व ग्रामपंचायत सदस्य सुनिता जावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रस्ताविक भीमराव घोडेराव यांनी केले. यावेळी पत्रकार आशुतोष गायकवाड, किशोर जावळे, प्रवीण जावळे, जितेंद्र पैठणपगार, मुकेश जावळे, संजय कांबळे, आर्यन जावळे, लखन जावळे, , राकेश कांबळे, अवि समुद्रे, शिवम पैठणपगार, नाना गायकवाड, पंकज पैठणपगार, नितीन जावळे, अभय बोराडे, अनिल जावळे उपस्थित होते.











Comments