window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

खर्ड्यात अवैध गुटखा व तंबाखू टपऱ्यांविरुद्ध धडक कारवाई; २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले



खर्डा प्रतिनिधी/२६ नोव्हेंबर२०२५

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींकडून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला आणि शरीरासाठी हानिकारक ठरलेला गुटखा, सुगंधीत सुपारी, तंबाखूचा मोठा साठा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. पोना श्यामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रदीप मोहन लोखंडे (वय 60, रा. खर्डा) आणि अशोक बाबासाहेब शिंदे रा. खर्डा यांच्याकडुन


वेगवेगळ्या ब्रँडचे गुटखा व तंबाखू असा एकूण 5,613 रुपयांचा माल जप्त झाला आहे. हा प्रतिबंधित माल विक्रीसाठी ठेवला होता, ज्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींकडून जाफरानी जर्दा, गोवा 1000, विमल पान मसाला, हिरा, राज निवास, डायरेक्टर स्पेशल अशा विविध प्रकारचे गुटखा व तंबाखूचे पुडे जप्त केले आहेत. आरोपींनी हा माल विक्रीसाठी ठेवला होता, ज्यामुळे गुन्हे भारतीय दंड संहिता कलम 223, 274, 275 प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


ही कारवाई महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर पोलिसांची कडक नजर असल्याचे दाखवते, कारण या प्रकारची विक्री आणि वाहतूक आरोग्यास मोठा धोका असते. स्थानिक गुन्हे शाखा अशा कारवाया नियमितपणे करत असून प्रतिबंधित वस्तूंचा साठा आणि अवैध विक्री रोखण्यास लक्ष्य ठेवले आहे.


कोट

"खर्डा येथे अनेक ठिकाणी प्रतिबंधित गुटखा, सुगंधीत सुपारी आणि तंबाखूचे टपऱ्या असून युवकांच्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे या अवैध विक्रीवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे, तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासनाने तत्पर व कडक पावले उचलेली पाहिजेत अशी जणतेतून मागणी होत आहे."

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.