ग्रामपंचायतच्या मागे सुरू होता अवैध दारूचा धंदा,खर्डा पोलिसांनी टाकला दारू अड्ड्यावर छापा
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

खर्डा प्रतिनधी/३ऑक्टोबर२०२५
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनेगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे सुरू असलेला अवैध दारू अड्डा खर्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे.सुरत वायकर (रा. सोनेगाव) हा पत्र्याचे शेड टाकून देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच साप्ताहिक पोलीस वारंटमध्ये प्रसिद्ध झाली होती.
येथील अवैध धंद्यामुळे गावातील अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.सदर माहिती सपोनि उज्वलसिंह राजपुत यांना मिळताच त्यांनी कारवाईसाठी पथक तयार केले. आज सकाळी त्यांनी पोलीस कर्मचारी शशी म्हस्के, बाळु खाडे आणि पोहेकाँ पालवे यांच्या सोबत सोनेगाव येथे छापा टाकत अवैध दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.या प्रकरणी आरोपी सुरत वायकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद शशी म्हस्के यांनी नोंदवली आहे.या कारवाईनंतर सोनेगाव परिसरात समाधानाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांकडून खर्डा पोलिसांचे कौतुक होत आहे. तसेच खर्डा हद्दीत इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











Comments