चोंडी प्रकल्पाला गती देण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांचे जलद परवानगीचे निर्देश
- Police warrant
- Feb 11
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/11 फेब्रुवारी2026
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी चोंडी प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यासाठी उपविभाग करून टप्प्याटप्प्याने परवानग्या मंजूर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.प्रकल्प अंमलबजावणीत विलंब टाळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयपूर्ण दृष्टिकोन ठेवावा, असे प्रा. शिंदे म्हणाले. "प्रशासकीय प्रक्रिया सुलभ केल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होईल," असा त्यांचा विश्वास आहे.बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रलंबित परवानग्या, निधी व कार्ययोजना यावर सखोल चर्चा झाली. संबंधित विभागांना तातडीचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले गेले.

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले.यावेळी सं. द. चोपडे (मु.अ. पुणे SP), विवेक माकुंदे (ऊ. रा. कां. मंडळ, अहिल्यानगर), किण रुलमदानी व अंजली कलमदानी (आर्किटेक्ट्स), इंजि. लक्ष्मीकांत जाधव (का. अ.सा. बांधकाम विभाग), प्रवीण घोरपडे, उत्तम धायगुडे, नितीन पाटील व प्रशांत वाकचौरे (विभागीय अभियंते) उपस्थित होते.स्थानिक विकास व पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या या प्रकल्पाला आता अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.











Comments