window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

जाणीव ट्रस्टसोबत अहिल्यानगर पोलीसांचे विद्यार्थीनींसाठी जनजागृती अभियान; जामखेडच्या ल.ना. होशिंग विद्यालयातही मोठा सहभाग!



जामखेड प्रतिनिधी: 1 फेब्रुवारी2025

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि जाणीव ट्रस्ट, वसई-विरार यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान इयत्ता 7 ते 9 वीच्या विद्यार्थीनींसाठी आत्मनिर्भरता, सुरक्षित जीवन, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक व सोशल मीडिया धोक्यांबाबत जनजागृती अभियान राबविले गेले. या अभियानात प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे विद्यार्थीनींना सजग करण्यात आल्या. विशेषतः निकटवर्ती व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासाबाबत बोलण्यास प्रोत्साहन देण्यात आले. काही विद्यार्थीनींनी स्वतःच्या तक्रारी मनमोकळेपणे सांगितल्या असून, पोलीसांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.


जामखेड तालुक्यातील ल.ना. होशिंग विद्यालयातही हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. एकूण 10 शाळांमध्ये सुमारे 4,000 विद्यार्थीनींना मार्गदर्शन मिळाले, ज्यात जामखेडची ही शाळाही समाविष्ट आहे. शाळा-महाविद्यालयांना अहिल्यानगर पोलीस दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस दल भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


हा उपक्रम पुढील शाळांमध्ये राबविण्यात आला;


1) केंद्रीय विद्यालय, क्रमांक 01, भिंगार कॅम्प.


2) साई एंजल इंटरनॅशनल स्कुल, तवलेनगर.


3) अंबिका विद्यालय, केडगांव.


4) न्यु आर्ट कॉलेज, रिसिडेन्शिअल, बालीकाश्रम रोड.


5) श्रीकांत प्रेमराज गुगळे, माळीवाडा.


6) प्रियदर्शनी विद्यालय, भिंगार.


7) भाऊसाहेब फिरोदीया व अशोक फिरोदीया विद्यालय, माळीवाडा.


8) ल.ना होशिंग विद्यालय, जामखेड.


9) भिंगार हायस्कुल, भिंगार.


10) पोतदार इंटरनॅशनल हायस्कुल केडगांव.


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.