जामखेड कलाकेंद्रावर हातात कोयता घेऊन दहशत माजवून दर महिन्याला खंडणीची मागणी, नृत्यांगनांवर छेडछाड;सराईत गुन्हेगार ‘चिंग्या’ मोरेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Police warrant
- Oct 25
- 2 min read

प्रतिनिधी/8ऑक्टोबर2025
जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका सांस्कृतिक कलाकेंद्रामध्ये हातात कोयता घेऊन धाड टाकत दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अक्षय उर्फ चिंग्या मोरे व त्याच्या साथीदारांविरुद्ध जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत आरोपींनी कलाकेंद्रातील खुर्च्या, टेबल, तसेच स्कुटीची तोडफोड केली असून फिर्यादी व नृत्यांगनांशी अश्लील वर्तन व छेडछाड केल्याची देखील तक्रार आहे.घटनेचा तपशीलरविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे (रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) याने शुभम लोखंडे, सतिश टकले व नागेश रेडेकर (रा. आष्टी, जि. बीड) या साथीदारांसह रेणुका कला केंद्र येथे धाड टाकली.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
या वेळी त्यांनी थिएटरचे मालक अनिल पवार तसेच त्यांचे पुत्र परशु व मोहित पवार यांना दरमहा एक लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास थिएटर चालू देणार नसल्याची धमकी देत हातातील कोयत्याने कलाकेंद्रातील खुर्च्या, टेबल व स्कुटीची तोडफोड केली. त्यानंतर आरोपींनी नृत्यांगना मुलींची छेडछाड करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. फिर्यादीने मधे पडताच आरोपींपैकी एकाने तिचा विनयभंग करून ढकलले.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवळकर करत आहेत.नृत्यांगनांचा संतापकलाकेंद्रातील नृत्यांगनांनी सांगितले की, अशा प्रकारचे त्रास गुंडांकडून वारंवार होत असतात. तक्रार केली की पुन्हा धमक्या दिल्या जातात. “आमच्या नृत्यकामावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. हे काम थांबवल्यास आम्हाला उपासमारीची वेळ येईल,” असे एका नृत्यांगनेने सांगितले.आरोपी चिंग्या मोरेचा गुन्हेगारी इतिहासया प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या मोरे याच्यावर जामखेड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी एका दुहेरी हत्याकांडातील अल्पवयीन आरोपी राहिला आहे. तसेच हाफ मर्डर, खंडणी, कलाकेंद्र फोडणे, तसेच पाटोदा येथील गोळीबार यासारख्या गंभीर प्रकरणांत त्याच्यावर कारवाई झाली आहे. तो एकाहून अधिक वेळा तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.परस्पर विरोधी फिर्याददरम्यान याच घटनेत दुसऱ्या बाजूने शुभम लोखंडे यानेही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तो व त्याचे मित्र जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथून जात असताना परशु पवार यांच्या वाहनासंदर्भाने वाद झाला. त्यानंतर त्यांना नटराज कला केंद्रात बोलावून आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करून कुकरी, दगड, लोखंडी चैन व दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले.या घटनेत एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवळकर करत आहेत.











Comments