जामखेड खूनानंतर सासवडमध्ये दुसरा खून! दुहेरी हत्याकांड उघड
- Police warrant
- 24 hours ago
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/20 डिसेंबर2025
पुणे ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे दुहेरी खुनाचा गुन्हा उघडकीस आला. गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडला खून करून पुण्यात आलेल्या नीरज गोस्वामीने ९ डिसेंबरला सासवडमध्ये दुसरा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस बांधकाम साइटवर राजू दत्तात्रेय बोराडे (३८, रा. सासवड, ता. पुरंदर) याचा गळा चिरून क्रूर खून झाल्याचे उघड झाले. सासवड पोलीस आणि गुन्हे शाखेने सीसीटीव्ही तपासले असता, दोन संशयित दिसले. कोंढवा, हडपसरसह विविध भागांत पथके रवाना केली.वाईन दुकानातच गुन्ह्याचा छडा!
आनंद वाईन्सला दारू घेण्यासाठी आलेल्या संशयिताला पकडले. चौकशीत त्याने सूरज प्रकाश बलराम निषाद हे नाव सांगितले. कबुलीत निषादने साथीदार नीरज गोस्वामीसह बोराडे याचा दारूच्या नशेत वादातून खून केल्याची कबुली दिली.
गोस्वामीने जामखेडला पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (२२) याचा खून केल्याचेही सांगितले.पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अविनाश शिळीमकर, कुमार कदम, सहाय्यक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.











Comments